नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी ९९ हजार ३०० कोटी रुपये खर्च करण्याची घोषण केली असून कौशल्य विकासासाठी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मार्च २०२१ पर्यंत देशभरात १५० शिक्षण संस्थांची स्थापना होईल. या संस्थांमध्ये कौशल्या विकासाचे प्रशिक्षण दिले जाईल, असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
FM Nirmala Sitharaman: We propose Rs 99300 crores for education sector in 2020-21 and Rs 3000 crores for skill development. #BudgetSession2020 pic.twitter.com/7P4uqdP8JO
— ANI (@ANI) February 1, 2020
शिक्षण क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला मंजुरी मिळली. पीपीपी मॉडेलद्वारे देशात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार, उच्च शिक्षणावर भर देण्यात येणार, स्किल डेव्हलपमेंटवर ३ हजार कोटी खर्च करण्यात येणार आहे. भारताला उच्च शिक्षणाचा हब बनविणार, ब्रीज कोर्सेच्या माध्यमातून रोजगार वाढविण्यार भर, विदेशातील नोकरीसाठी नर्स, शिक्षण तयार करणार, मेकी इन इंडियानंतर आता मोदी सरकारचे स्टडी इन इंडिया हे नवे मिशन असणार आहे.
FM Nirmala Sitharaman: Viability gap funding window to be set up to cover hospitals, with priority given to aspirational districts that don't have hospitals empanelled under Ayushman Bharat scheme. #Budget2020 https://t.co/MsiyQWNwZ3
— ANI (@ANI) February 1, 2020
भारतातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी आशिया, आफ्रिका खंडातील देशांमध्ये पाठवले जाईल. डॉक्टरांसाठी एक ब्रीज प्रोग्राम शुरु केला जाईल, जेणेकरुन प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना प्रोफेशनल गोष्टी शिकवल्या जातील. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरुण अभियंत्यांना इंटर्नशिपची सुविधा दिली जाईल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.