HW News Marathi
देश / विदेश

Budget 2022: अर्थसंकल्पानंतर ‘या’ गोष्टी झाल्या स्वस्त

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. याआधीच देशातील सर्व सामान्य नागरिक हे महागाई, पेट्रोल-डिजेलच्या कमीत वाढ होत आहे. अर्थमंत्र्यांनी आज (१ फेब्रुवारी) सादर केल्यानंतर अर्थसंकल्पात आरबीआयचे डिजिटल चलन येईल, अशी घोषणा केली. कोरोनाच्या सावटात नागरिकांना करमध्ये दिलासा मिळेल असे वाटत होते. परंतु करदात्यांच्या हाती निराशा आली आहे.

तसेच अर्थसंकल्पामध्ये मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त झाले आहेत. यामुळे सर्व सामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रवर लक्ष केंद्र केल्याचे दिसून आले आहे. त्या व्यतिरिक्त अर्थमंत्र्यांनी केमिकल्सवरील कस्टम ड्युटी घटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जेम्स अँड ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी ५ टक्क्यांनी घटवण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना जेम्स अँड ज्वेलरी स्वस्तात मिळणार आहेत.

 ‘या’ गोष्टी स्वस्त झाल्या

  • परदेशातून येणाऱ्या मशिन्स
  • कापड – चामड्याच्या वस्तू
  • शेतीची अवजारे
  • मोबाईल – चार्जर
  • मोबाईल फोन
  • शूज – चपला
  • हिऱ्याचे दागिने
  • जेम्स अँड ज्वेलरी

‘हे’ महागले

कॅपिटल्स गुड्सवर आयात शुल्कावरील सूट रद्द करण्यात आले. तर आता कॅपिटल्स गुड्सवर ७.५ टक्के आयात शुल्क आकारण्यात आली आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात १००० लोकांना Quarantine करणारी व्यवस्था शासनाला अर्पण !

Arati More

चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणासाठी केंद्राच्या गाईडलाईन्स जारी

News Desk

शरद पवार मुख्यमंत्र्यांना शिकवणार पूरपरिस्थिती नियोजन, २० तारखेला होणार भेट..!

Gauri Tilekar