HW News Marathi
देश / विदेश

“सरकारनं भींती उभारायचं काम करु नये”, राहूल गांधींचा केंद्राला खोचक सल्ला

नवी दिल्ली | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांची नाकेबंदी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रचंड तयारी केली आहे. काही ठिकाणी रस्त्यावर खिळे टाकण्यात आले आहेत तर काही मार्गांवर भिंती उभारण्यात आल्या आहेत. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. केंद्र सरकारने पूल बांधावेत. भिंती नव्हे, असा टोला राहुल गांधी यांनी ट्विटमधून लगावला आहे. तर, पंतप्रधानजी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे.

शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला चक्का जाम करणार असल्याचे जाहीर केले आहे. या चक्का जामसाठी दिल्ली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. मोठे मोठे खिळे असलेले बॅरिगेट्स तयार करण्यात आले आहेत तर कुठे पुलांवर खिळे ठोकले आहे. याचे सगळे फोटो राहूल गांधी यांनी ट्विट केले आहेत आणि त्यांनी असं लिहिलं आहे की, सरकारने पुल उभारायचं काम करा भींती उभारण्याची कामं करु नका, असा खोचक सल्ला त्यांनी केंद्राला या फोटो मार्फत दिला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी गाझीपूर सीमा, टिकरी बॉर्डर आणि सिंधु बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेट्सही लावण्यात आले आहेत. त्याशिवाय रस्त्यावर मोठमोठे खिळे ठोकण्यात आले असून अनेक ठिकाणी भिंतीही उभारल्या आहेत. या शिवाय जमावाने दिल्लीत येऊ नये म्हणून सीमेवर टोकदार जाळ्याही लावण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या सीमेभोवती एक प्रकारची तटबंदीच करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंना आमदार करू नका ! अंजली दमानीयांची राज्यपालांकडे धाव  

News Desk

मेडिकल व्हिसाची माहिती दिल्यास भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडतील

News Desk

फटाके फोडणे आणि मारणे ही भारतीय संस्कृती नाही – प्रकाश जावडेकर

News Desk