HW News Marathi
देश / विदेश

CBSE बोर्डाच्या १०वी-१२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

 

नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाने शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी केलेल्या सूचना सीबीएसई बोर्डाने विचारात घेणार असून आगामी परीक्षांचे आयोजन करताना त्यानुसार आवश्यक तयारी करण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या परीक्षांच्या तारखेच्या संदर्भात अधिक माहिती शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट cbse.nic.in वर मिळणार आहे.

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या ४ मे २०२१ पासून परीक्षा सुरू होणार असून १० जूनपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहेत. तर प्रॅक्टिकल्स हे १ मार्चपासून सुरू होणार आहेत. तसेच १५ जुलै पर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांकयांनी काही दिवसांपूर्वी एका वेबिनारद्वारे शिक्षकांसोबत संवाद साधताना परीक्षा आयोजनावर म्हटलं होतं की, सीबीएसई बोर्डाच्या २४ हजारांहून अधिक शाळा या ग्रामीण भागात आहेत त्यामुळे ऑनलाईन परीक्षा सध्यातरी शक्य नाहीयेत. त्यामुळे हे स्पष्ट आहे की यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत.

सीबीएसई बोर्डाच्या २०२१ या वर्षात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसण्यासाठी महत्वाचे कागदपत्र म्हणजे हॉल तिकिट आहे. परीक्षेपूर्वी बोर्डाकडून विद्यार्थ्यांना हॉलतिकिट दिले जातात. नियमित विद्यार्थ्यांसाठी शाळांकडून हॉलतिकिट दिले जातात तर इतर विद्यार्थी हे बोर्डाच्या वेबसाईटवरुन हॉलतिकिट डाऊनलोड करु शकतात. बोर्डाकडून हॉल तिकिट हे विद्यार्थ्यांना २०२१मध्येच मिळणार असून त्याची अधिकृत तारीख आणि इतर माहिती बोर्डाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द ! मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला वर्ष पूर्ण

News Desk

भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत, सामनातून भाजपवर टीका

News Desk

भारताने सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारली, उपांत्यपूर्व फेरीत स्थान झाले निश्चित

News Desk