HW News Marathi
देश / विदेश

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या, तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली | ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्याची दुर्घटना घटली आहे. चार मजली आणि बांधकाम सुरू असलेली सहा मजली अशा दोन्ही इमारती कोसळल्या आहेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

या दोन्हीपैकी एका इमारतीत १० ते १२ कुटुंब राहत होती. चार मजली इमारत जीर्ण झाली होती, तर दुसऱ्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. या आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान या इमारती कोसळल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच केंद्रीय मंत्री महेश शर्मा घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्याचा आढावा घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मी द्विपक्षीय चर्चेसाठी उत्साही | पंतप्रधान मोदी 

Gauri Tilekar

#PulwamaAttack : ४० जवान शहीद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांनी केला निषेध

News Desk

देशात पुढची १० ते २० वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही !

Gauri Tilekar
राजकारण

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून

News Desk

नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्यापुर्वी पंतप्रधान मोदींनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक घेऊन पावसाळी अधिवेशनात सहकार्य करावे असे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांना विशेषत: विरोधी पक्षांना केले आहे. मात्र, मागासवर्गीय आणि दलितांच्या आरक्षण प्रश्नावरुन अधिवेशन काळात आम्ही सरकारला जाब विचारणार असल्याचे समाजवादी पक्षाने स्पष्टपणे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी लोकसभा अध्यक्षांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांशी पावसाळी अधिवेशनासंदर्भात चर्चा केली आहे.

यावेळी सभागृहातील विविध चर्चांमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहनही मोदींनी केली या आवाहनाला सर्वांनी सहमती देखील दर्शवली. परंतु या बैठकीनंतरही संसदीय सभागृहात शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, महागाई यांसारख्या मुद्द्यांवरुन विरोधक रान उठवतील, असे दिसून येत आहे. तर मॉब लिंचिंगप्रकरणी पहिल्यादिवशीच स्थगन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी दलित आणि मागासवर्गींच्या आरक्षणाच्या मुद्द्याबाबत कुठलिही तडजोड करणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे.

संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनीही अधिवेशन उत्तमप्रकारे पार पडावे, अशी आशा व्यक्त केली आहे. संसदेचे कामकाज सुयोग्य रितीने चालणे हे देशहित आहे. तर आम्ही प्रत्येक राष्ट्रीय मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचेही कुमार यांनी म्हटले आहे. तसेच राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू यांनीही देखील राज्यसभेतील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन पावसाळी अधिवेशनात सरकारला सहकार्य करावे यासाठी आवाहन केले आहे. त्यामुळे आज सुरु होणा-या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या अजेंड्यामुळे रंगत अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

 

 

Related posts

राफेल कराराच्या मुद्दयावरून राजकारण पेटले

swarit

प्रत्येक मतदारसंघातील व्हीव्हीपॅटच्या ५ मशीनची पडताळणी होणार, सर्वोच्च न्यायालय

News Desk

बारामती जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पवारांच्या शुभेच्छा

News Desk