HW News Marathi
देश / विदेश

बुर्ज खलिफा या इमारतीत भारद्वाज बंधुंचा फ्लॅट

पुणे | बिटकॉईन या आभासी चलनामध्ये गुंतवणूक केलेल्यांच्या पैशातून जगातील सर्वांत उंच असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीत फ्लॅट खरेदी करण्यासाठी अमित भारद्वाज याने ५ कोटी १० लाख रुपये गुंतविले आहेत असे तपासात निष्पन्न झाले आहे़. आर्थिक गुन्हे शाखेने बिटकॉईन या चलनात देशभरातील अनेकांची फसवणूक करणाऱ्या अमित भारद्वाज याच्यासह आठ आरोपींविरुद्ध न्यायालयात सोमवारी दोषारोपपत्र दाखल केले़ या ४ हजार पानी दोषारोपपत्रात त्यांनी यातून मिळविलेला पैसा कसा परदेशात गुंतविला याची माहिती दिली आहे़.

गेन बिटकॉईन कंपनीचा संचालक अमित महेंदरकुमार भारद्वाज त्याचा भाऊ विवेककुमार यांचासह अन्य साात आरोपींवीरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आली आहेत. आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने भारद्वाज आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध राज्यातील पहिला गुन्हा पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

  1. बिटकॉईनमधी पैशातून भारद्वाज बंधूनी हॉगकॉग येथे अमेझ मायनिंग अँड ब्लॉकचेन रिसर्च व ग्रिन ओव्हरसिल, बीव्हीआय येथील क्रिप्टोकॅपिटल कंपनी, इस्टोनिया येथे क्रिप्टो एएमसी, दुबई येथील एबी मार्केटिंग कन्सल्टंसी एफझेडइ, अमेझ मेगा अलायन्स व युएसए येथील एबीसी रिसर्च अँड कन्सल्टंसी या कंपन्यांमध्ये वर्ग केले आहे़.
  2. तसेच दुबईतील जुमेरा लेक टॉवर येथे ३१ व्या मजल्यावर ७ ऑफिसेस त्याने जानेवारी २०१८ मध्ये घेतले़ त्यासाठी १७ कोटी रुपये, मरिन प्रिन्सेस टॉवर येथे ५८ व्या मजल्यावर ४ ऑफिसेससाठी २ कोटी १२ लाख रुपये, बिझनेस बे, तमानी टॉवर येथे ४ ऑफिसेससाठी ३ कोटी ४० लाख, बुर्ज खलिफातील फ्लॅटसाठी ५ कोटी १० लाख रुपये खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे़.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत समाजवादी पार्टीकडून राज्यसभेचा भरला उमेदवारी अर्ज

Aprna

शिवराजसिंह चौहान यांनी चौथ्यांदा घेतली मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

News Desk

ज्योतिरादित्य शिंदेंचा भाजपमध्ये प्रवेश, काँग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा राहिलेला नाही !

swarit