HW News Marathi
देश / विदेश

राफेल कराराबाबत कॅगचा अहवाल आज लोकसभेत

नवी दिल्ली | ६ राफेल लढाऊ विमानाच्या कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल (कॅग) चा अहवाल आज संसदेत सादर करण्यात येणार आहे. राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोधाचा सामना करावा लागत असून या अहवालानुसार कॅग विमानाच्या किंमती सादर करणार नाही. २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राचा उद्या मंगळवार हा शेवटचा दिवस असेल.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल खरेदी प्रकरणी कोट्यावधीचा घोटाळा झाल्याचा आरोप करत आहे.

कॉम्पट्रोलर अँड ऑडिटर जनरल राजीव महर्षी हे राफेल सौद्याचे वेळी वित्त सचिव होते. भारत व फ्रांसच्या दरम्यान झालेल्या या कराराच्यावेळी महर्षी वित्त सचिव असल्यामुळे काँफ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा आरोप विरोधकांनी लावला आहे. काल काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बलयांनी पत्रकार परिषद घेऊन या मध्ये अनेक आरोप महर्षी अँड मोदी सरकारवर केले, राजीव महर्षी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचविण्याचा प्रयत्न करतील असे हे ते या वेळी म्हणाले.

सुत्राने दिलेल्या माहितीनुसार अर्थमंत्रालयाच्या ऑडिटवरील प्रेस नोट ऐवजी कॅगच्या अनधिकृत प्रेस नोटमध्ये उद्या याबाबत माहिती देण्यात येईल. विरोधी नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर युपीएच्या काळातील 126 राफेल खरेदी करार रद्द केल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी रिलायन्सचे उद्योजक अनिल अंबानी यांना फायदा पोचविण्यासाठी महागडा सौदा केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase : आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळली, दोषींना फाशी अटळ

News Desk

CTET परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार

Aprna

कोरोना चाचणीसाठी आता सर्वात स्वस्त टेस्टिंग किट बाजारात उपलब्ध!

News Desk