HW News Marathi
देश / विदेश

CTET परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार

नवी दिल्ली | सीबीएसईच्या वतीने सीटीईटी २०२१ ते २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा आज निकाल लागणार आहे. सीटीईटीचा आज (१५ फेब्रुवारी) निकाल हा ctet.nic.in त्यांच्या अधिक वेबसाइटवर जाऊन पाहू शकता. सीबीएसईने प्रथमच केंद्रीय शिक्षण पात्रता परीक्षा (सटीटी) निकालही आज लागणार आहे. सीटीईटी परीक्षेच्या पेपर – १ मध्ये एकूण ४, १४,७९८ उमेदवार तर पेपर – २ मध्ये एकूण २, ३९, ५०१ उमेदवार पात्र ठरले.    

दरम्यान, सीटीईटी परीक्षा ही वर्षातून दोनदा घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार हे देशातील केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि आर्मी स्कूलमध्ये शिक्षकांच्या पदावर नियुक्तीवर अर्ज करू शकतात. सीटीईटीच्या पेपर १ मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवीमधील शिक्षण भरतीसाठी पात्र मानले जातात. तर पेपर २ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षक भरतीसाठी पात्र असतात. 

या परीक्षेमध्ये एकूण १५० गुणांची होती. या परीक्षेत उत्तीर्णीसाठी खुल्या प्रवर्गासाठी ६० टक्के म्हणजेच ९० गुण मिवणे आवश्यक आहे. तर राखीव प्रवर्गासाठी (एससी, एसटी आणि ओबीसी) उमेदवारांना ५५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम भक्तांसाठी मोदी सरकार बनवणार मुव्हिंग ब्रीज, पहा व्हिडीओ

News Desk

काश्मीरमधील चकमकीत १ दहशतवाद्याचा खात्मा

News Desk

करुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंरीत, २ जणांचा मृत्यू ४० जखमी

swarit