नवी दिल्ली | भारतीय बँकांचे सुमारे ९ हजार कोटींचे कर्जाचा चुना लावून लंडनमध्ये फरार झालेल्या मद्यसम्राट उद्योगपती विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने परवागनी दिली आहे. सीबीआयच्या प्रयत्नांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.
Chief Magistrate Judge Emma Arbuthnot has found prima facie a case against Vijay Mallya for fraud, conspiracy and money laundering. https://t.co/BWVBpY7DTn
— ANI (@ANI) December 10, 2018
माल्या देशाबाहेर पळून गेल्याने मोदी सरकारची मोठी नाचक्की झाली होती. तेव्हापासून माल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. या निकालाच्या वेळी हजर राहण्यासाठी ‘सीबीआय’चे सहसंचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखालील ‘सीबीआय’ व ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त तुकडी येथे आली आहे.
भारत सरकारने केलेल्या प्रत्यार्पण अर्जावर वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टातील न्यायाधीश एम्मा ऑर्बथनॉट या सोमवारी दुपारी निकाल जाहीर करणार आहेत. गेल्या वर्षी ७ डिसेंबरपासून ही सुनावणी सात दिवस व्हायची होती. प्रत्यक्षात ती त्याहून कितीतरी अधिक चालली आहे. यात भारत सरकारची बाजू ब्रिटनच्या क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्यावतीने मार्क समर्स यांच्या नेतृत्वाखालील प्रॉसिक्युटर्सनी मांडली आहे. मल्ल्याचा बचाव क्लेअर मॉन्टगोमेरी या ज्येष्ठ वकिलाने केला.
कर्जाची मुद्दल फेडायला मल्ल्या तयार
मल्ल्याने घेतलेल्या कर्जाची मुद्दल फेडायला तयार असल्याचे अलीकडेच ट्विटरवरून म्हटले होते, मात्र हे सर्व प्रकरण बंद करण्याची मागणी त्याने केली होती. इतकेच नाही तर त्याने सेटलमेंटचा प्रस्तावही दिला असून कर्ज फेडायला आपण 2016 मध्येच तयार होतो असेही म्हटले आहे. त्याने सरकारला याबाबत एक पत्रही पाठवले आहे. मात्र त्याचे कुठल्याही प्रकारचे उत्तर सरकारने दिलेले नाही.
Well said @PritishNandy Sadly the media creates its own narrative. I have been making settlement offers since 2016 which were rejected without any dialogue as https://t.co/jO4t6XPrSV mid 2018 I finally made an offer before the Karnataka High Court.Unconnected to extradition. https://t.co/8U7KmQ9YkU
— Vijay Mallya (@TheVijayMallya) December 6, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.