HW News Marathi
देश / विदेश

माल्ल्याच्या प्रत्यार्पणावर आज सुनावणी

नवी दिल्ली | भारतीय बँकांचे सुमारे ९ हजार कोटींचे कर्जाचा चुना लावून इंग्लंडमध्ये फरार झालेल्या उद्योगपती विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत आज (१० डिसेंबर) ब्रिटनच्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सीबीआयचे संयुक्त संचालक साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली सीबीआय आणि ईडीचे संयुक्त पथक रविवारी (९ डिसेंबर) ब्रिटनला रवाना झाले आहे.

भारत सरकारने केलेल्या प्रत्यार्पण अर्जावर वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टातील न्यायाधीश एम्मा ऑर्बथनॉट या सोमवारी दुपारी निकाल जाहीर करणार आहेत. गेल्या वर्षी ७ डिसेंबरपासून ही सुनावणी सात दिवस व्हायची होती. प्रत्यक्षात ती त्याहून कितीतरी अधिक चालली आहे. यात भारत सरकारची बाजू ब्रिटनच्या क्राऊन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्यावतीने मार्क समर्स यांच्या नेतृत्वाखालील प्रॉसिक्युटर्सनी मांडली आहे. मल्ल्याचा बचाव क्लेअर मॉन्टगोमेरी या ज्येष्ठ वकिलाने केला.

कर्जाची मुद्दल फेडायला मल्ल्या तयार

मल्ल्याने घेतलेल्या कर्जाची मुद्दल फेडायला तयार असल्याचे अलीकडेच ट्विटरवरून म्हटले होते, मात्र हे सर्व प्रकरण बंद करण्याची मागणी त्याने केली होती. इतकेच नाही तर त्याने सेटलमेंटचा प्रस्तावही दिला असून कर्ज फेडायला आपण 2016 मध्येच तयार होतो असेही म्हटले आहे. त्याने सरकारला याबाबत एक पत्रही पाठवले आहे. मात्र त्याचे कुठल्याही प्रकारचे उत्तर सरकारने दिलेले नाही.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक सुधारणा विधेयक आज लोकसभेत मंजूर

Aprna

ट्विटर कडून राहुल गांधींवर कारवाई !

News Desk

मी भाजपमध्ये जाणार नाही, पायलट निर्णयावर ठाम !

News Desk