नवी दिल्ली | CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १०वीच्या परीक्षा रद्द केल्या असून १२वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. दरम्यान, १०वीच्या विद्यार्थ्यांनी दिलासा मिळाला असला तरी १२वीच्या विद्यार्थ्यांना मात्र परीक्षेतून पुर्ण सुटका मिळाली नाही आहे. आज (१४ एप्रिल) दुपारी १२ वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा मे-जून महिन्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. तारीख अद्याप सांगितली नसून लवकर तारीखही सांगण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तुर्तास परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
Board Exams for Class 10th cancelled & 12th postponed. Results of Class 10th will be prepared on the basis of an objective criterion to be developed by the Board. Class 12th exams will be held later, the situation will be reviewed on 1st June by the Board: Ministry of Education pic.twitter.com/ljVuUkEChB
— ANI (@ANI) April 14, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.