HW Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक भारतीय जवान शहीद

श्रीनगर | देशभरात होळी उत्साहात सुरू असताना जम्मू-काश्मीरच्या सीमेवर एक जवान शहीद झाला आहे. पाकिस्तानच्या कुरापती थांबन्याचे नाव घेत नाही. काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये आज (२१ मार्च) पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीचे उल्लंघनादरम्यान झालेल्या गोळीबतारीत एक जवान शहीद झाला आहे. तर दुसरीकडे बारामूला, सोपोर आणि बांदीपुरा या भागात दहशतवाद्यांकडून सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य केले आहे. सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सोपोर येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ पथकावर ग्रेनेड हल्ला केला. या  ग्रेनेड हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत.

सोपोरमधील मुख्य चौकात सीआरपीएफच्या पथकावर झालेल्या हल्ल्यात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. यानंतर परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. चकमक सुरू असलेल्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. बांदीपोरा येथील हाजिन येथे देखील सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. अजूनही या भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. पोलीस या दहशतवाद्यांचा शोध घेत असल्याची माहित मिळाली आहे.

 

Related posts

भारताची कारवाई पाकिस्तानच्या जिव्हारी, संसदेत दिले ‘इम्रान खान मुर्दाबाद’चे नारे

News Desk

कर्नाटकात इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

News Desk

अमित शहाच्या मुलाविरोधातील केस प्रशांत भूषण लढणार

News Desk