नवी दिल्ली | मध्य प्रदेशातील इंदूर महापालिका अधिकारी धीरेंद्र बायस यांना क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांना रविवारी (३० जून) जामीन मिळाला आहे. दरम्यान, आकाश विजयवर्गीय यांना जमीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी इंदूरमधील भाजप कार्यालयासमोर चक्क हवेत गोळीबार केला. आकाश विजयवर्गीय यांनी जामीन मिळाल्याबद्दल आनंद साजरा करताना त्याच्या समर्थकांनी पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेच्या सर्व नियमांना पूर्णपणे बगल दिली आहे.
Madhya Pradesh: Celebratory firing outside BJP MLA Akash Vijayvargiya's office in Indore after he got bail in an assault case. (29-06) pic.twitter.com/d1j2d03hLY
— ANI (@ANI) June 30, 2019
इंदूरमधील जुन्या जीर्ण झालेल्या घरांना तोडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्याला स्थानिक भाजप आमदार आकाश विजयवर्गीय यांनी चक्क क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आकाश विजयवर्गीय यांना अटक करण्यात आली होती. भोपाळच्या विशेष न्यायालयाने शनिवारी (२९ जून) २०-२० हजारांच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. आकाशच्या सुटकेची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करत बंदुकीने हवेत गोळीबार केला. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.