HW News Marathi
देश / विदेश

केंद्राकडून देशातील दुष्काळग्रस्त राज्यांना मदतनिधी मंजूर, महाराष्ट्राला सर्वाधिक मदत

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (२९ जानेवारी) झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीत केंद्राकडून देशातील दुष्काळग्रस्त राज्यांना मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. देशातील दुष्काळग्रस्त राज्यांना मंजूर करण्यात आलेल्या एकूण ७ हजार २१४ कोटींच्या मदतनिधीपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजेच ४ हजार ७१४ कोटींची मदत देण्यात आली आहे.

केंद्राकडून दुष्काळग्रस्त राज्यांना मंजूर करण्यात आलेल्या ७ हजार २१४ कोटींच्या एकूण निधीपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक म्हणजेच ४,७१४.२८ कोटी, तर कर्नाटकला ९४९.४९ कोटी, आंध्रप्रदेशला ९००.४० कोटी, उत्तर प्रदेशला १९१.७३ कोटी, गुजरातला १२७.६० कोटी, हिमाचल प्रदेशला ३१७.४४ कोटी तर पुद्दुचेरीला १३.०९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना एनएबीकडून अटक

News Desk

#Article370Abolished : काश्मीरमधून कलम ३७० रद्द, विभाजन विधेयक लोकसभेत मंजूर

News Desk

मोहम्मद शामीच्या पत्नीने लिहलेल्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

News Desk