HW Marathi
देश / विदेश

केंद्राची रिझर्व्ह बँकेकडे ३ लाख ६० हजार कोटींची मागणी, बँकेचा स्पष्ट नकार

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये निर्माण झालेला ताण हा आता नवीन नाही. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडे सध्या असलेल्या अतिरिक्त रकमेतील एक तृतीयांश रक्कम म्हणजेच ३ लाख ६० हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. परंतु अतिरिक्त रक्कम केंद्राला दिल्यास बँकेचे भांडवल कमी होईल, असे सांगत रिझर्व्ह बँकेने केंद्राला ही रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. रिझर्व्ह बँकेने ही रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेकडे सध्या असलेल्या ९ लाख ५९ हजार कोटी रुपये एवढी अतिरिक्त रक्कम आहे.
सरकारला हा पैसा लोकसभा निवडणुकीत वापरण्यासाठी हवा असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे. ‘सध्याची देशाची आर्थिक स्थिती पाहता सरकार व रिझर्व्ह बँकेने एकत्र येऊन या अतिरिक्त रकमेचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे’, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील रुपयाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणारी वाढीमुळे आधीच भारताची अर्थव्यवस्था आधीच कोलमडली आहे.

Related posts

बहुमत न मिळाल्यास भाजपाला बसपा ने पाठिंबा द्यावा : रामदास आठवले

News Desk

#Budget2019 :अंतरिम अर्थसंकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk

अलट बिहारी वाजपेयी यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु

News Desk