नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका स्थलांतरित मजुरांना बसला. बहुतांश मजूर आपल्या राज्यांत, आपल्या घरी परतले. जवळपास ३ महिने कोणतेही काम न मिळाल्याने हातावर पोट असलेल्या या मजुरांची कोरोना काळात अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता केंद्राने स्थलांतरित मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘गरीब कल्याण रोजगार योजने’ची घोषणा केली आहे. या योजनेचा देशातील ६ राज्यांमधील ११६ जिल्ह्यांना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या राज्यातील स्थलांतरित मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार असल्याचा दावा केंद्राकडून करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेविषयीची माहिती दिली आहे.
#WATCH live from Delhi: FM Nirmala Sitharaman addresses media ahead of launch of 'Garib Kalyan Rojgar Abhiyaan' by PM Modi on 20th June. https://t.co/2928QUhqhT
— ANI (@ANI) June 18, 2020
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि ‘या’ ६ राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २० जून रोजी या योजनेचे उद्घाटन होईल. स्थलांतरित मजुरांसाठीची केंद्राची ‘गरीब कल्याण रोजगार योजना’ देशातील बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या राज्यांतील ११६ जिल्ह्यांना फायदेशीर ठरणार आहे. या योजनेंतर्गत स्थलांतरित मजुरांना २५ प्रकारची कामे दिली जातील अशी माहिती देण्यात आली आहे. स्थलांतरित मजुरांसाठीच्या या रोजगार योजनेसाठी केंद्राला एकूण ५० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. विशेष म्हणजे या केंद्राच्या या योजनेंतर्गत तब्बल २५ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध होईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या योजनेविषयीची माहिती माध्यमांना दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.