HW News Marathi
Covid-19

मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून ‘शिक्षण मंत्रालय’ असे नवे नामकरण

नवी दिल्ली | केंद्र सरकारने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नावात बदल करून शिक्षण मंत्रालय असे नवे नाव ठेवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या आज (२९ जुलै) झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रीय बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावेळी नव्या शैक्षणिक धोरणांना देखील केंद्राकडून परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून दुपारी ४ वाजता याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या निर्णयाच्या निमित्ताने आता शैक्षणिक धोरणातील बदलांचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल ३० वर्षांनंतर एक नवीन शिक्षण धोरण लागू होणार आहे. दरम्यान या शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी रमेश पोखरियाल यांच्याकडे असणार असल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आजचा रायगड जिल्हा दौरा रद्द

News Desk

देशातील एकूण कोरोना मृत्यूपैकी ३४ टक्के महाराष्ट्रात!

News Desk

सगळ्यांसाठी समान नियम ठेवा, परदेशी कंपन्यांच्या लसींसाठी नियम शिथिल केल्यानंतर सिरमची केंद्राकडे मागणी

News Desk