बंगळुरू | भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान – २च्या संदर्भात आनंदाची बातमी मिळाली आहे. इस्त्रोच्या अधिकाऱ्याने आज (९ सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, ‘विक्रमने हार्ड लँडिंग केले आहे आणि ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवले आहे. त्यानुसार विक्रम नियोजित स्थळाजवळ आहे. विक्रम तुटलेले नाही आणि ते सुरक्षित आहे.’ चंद्राच्या पृष्ठभागावर ते थोडे तिरके उभे असल्याची माहिती इस्त्रोच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
चांद्रयान – २ शनिवारच्या पूर्व सध्येला (७ सप्टेंबर) चंद्रापासून २.१ किलोमीटर अंतरावर गेल्यावर लँडर विक्रमशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित केला जाऊ शकतो. विक्रमचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरले असले, तरीही ते स्वत:च्या पायावर उभे राहू शकते.इस्त्रो प्रमुख के. सिवन यांनी काल (८ सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार विक्रम लँडरचे स्थान समजले आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरने विक्रमचा थर्मल फोटो पाठवला आहे. मात्र, अद्याप विक्रमशी संपर्क झालेला नाही, असे देखील सिवन यांनी सांगितले. आता लवकरच विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सिवन म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.