बेंगळुरू | ‘चांद्रयान – २’ च्या अयशस्वी प्रयत्नानंतरही खचून न जाता, आता ‘इस्रो’ ‘चांद्रयान -३’ च्या यशस्वी झेपेकरिता सज्ज होत आहे. इस्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी पत्रकार परिषदेत २०२० हे वर्ष ‘गगनयान’ आणि ‘चांद्रयान – ३’चे असणार असल्याची माहिती दिली. ‘चांद्रयान३’मध्ये लँडर, रोवर आणि प्रणोदन असणार आह. या दोन्ही मोदिमेसाठी केंद्र सरकारकडून संमत्तीही दिल्याची माहिती सिवन यांनी पत्रकार परिषदेत दिली. चांद्रयान- ३ मोहिमेच्या कामासाठी इस्रोची संपूर्ण टीम आपापल्या कामगिरीकडे जातीने लक्ष देण्यास सज्ज झाली आहे.
Indian Space Research Organisation Chief K Sivan: Government has approved Chandrayan-3, the project is ongoing. pic.twitter.com/KcJVQ1KHG7
— ANI (@ANI) January 1, 2020
याशिवाय गगनयान ही मानवी अंतराळ उड्डाण मोहिम असणार असून या यानाच्या उड्डाणासाठी ४ अंतराळवीरांचीही निवड करण्यात आली आहे. या अंतराळवीरांना अवकाशात घडणाऱ्या घडामोडी आणि अवकाशात यान फिरताना त्याची कक्षा कोणत्या दिशेला आहे. उपग्रह कोणत्या कक्षेत फिरत आहेत, अशा अनेक अंतराळातील महत्त्वाच्या बाबींचे प्रशिक्षण देण्यासाठीची प्रक्रिया कशी असते याचे प्रशिक्षण जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून रशियात देण्यात येणार आहे.
ISRO chief K Sivan: We have made good progress on Chandrayan-2, even though we could not land successfully, the orbiter is still functioning, its going to function for the next 7 years to produce science data pic.twitter.com/6tw683HTnk
— ANI (@ANI) January 1, 2020
‘चांद्रयान – ३’ आणि ‘गगनयाना’शिवाय यावर्षी इस्रो २५ नवीन मोहिमांवर काम करणार असल्याची माहितीही सेवन यांनी दिली. ‘चांद्रयान – २’ ही मोहीम इस्रोने केलेल्या मेहनतीचे एक असे फळ होते. ज्याच्याआधारे आता इस्रो ‘२०२०’ या वर्षी एकाहून अधिक मोहीमा फत्ते करण्याच्या जय्यत तयारीत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.