HW News Marathi
देश / विदेश

चार्ल्‍स मिशेल यांना गूगलची डुडलद्वारे आदरांजली

मुंबई | चार्ल्स-मिशेल डुलीपीच्या ३०६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ गूगलने डुडल तयार केले आहे. चार्ल्स-मिशेल यांना बहिऱ्यांचे पिता असे म्हटले जाते. १८ व्या शतकातील फ्रेंच सामाजिक कार्यकर्ते चार्ल्स-मिशेल यांनी एक प्रणाली तयारी केली होती. ज्या प्रणाली द्वारे बधिरांना सांकेतीक भाषा शिकविले जाते. ब-याच वर्षांनंतर अमेरिकेने देखील ही प्रणाली स्वीकारली. त्यानंतर ती संपूर्ण जगामध्ये पसरली. १७९६ मध्ये त्यांनी बधिरांसाठी प्रथम मोफत शाळा स्थापन केली.

कोण होते चार्ल्स-मिशेल :

२४ नोव्हेंबर १७१२ रोजी व्हर्सायच्या एका सुप्रसिद्ध कुटुंबात चार्ल्स यांचा जन्म झाला. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी गरिबांच्या सेवेमध्ये व्यतीत केले. पॅरिसच्या झोपडपट्टीत राहणा-या दोन बहिणी आपआपसात हातवारे करुन संवाद साधत असत. चार्ल्स यांनी त्यांची भाषा समजून घ्यायला सुरुवात केली. त्या नंतर त्यांनी बधिरांसाठी सांकेतिक भाषेची निर्मिती केली. त्या काळी बधिरांकडे सामान्य लोक वेगळ्या नजरेने बघत असत. त्याचबरोबर काही लोक त्यांचा तिरस्कार देखील करत असतं. चार्ल्स यांचे योगदान लक्षात घेऊन फ्रेंच सरकारने त्यांना एक मानवतेचे हीत ओळखणारा व्यक्ती म्हणून वेगळी उपाधी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिलासादायक ! अमेरिकेला सापडले ‘कोरोना’वरचे औषध

News Desk

कर्नाटकात कोरोना व्हायरसचा पहिला बळी

swarit

मानहानी प्रकरणी राहुल गांधींना सूरत न्यायालयाकडून जामीन मंजूर; जाणून घ्या संपर्ण प्रकरण

Aprna