HW News Marathi
राजकारण

बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही !

बारामती | “बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला तर तो केवळ ईव्हीएममधील घोळामुळेच होईल”, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती. मात्र, शरद पवार यांच्या या विधानाशी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फारकत घेतली आहे. “शरद पवार यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरणार नाही. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही. त्या निवडून येतील”, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे जर बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला तर तो केवळ ईव्हीएममधील घोळामुळेच होईल अशी भीती शरद पवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आली होती. “यंदाच्या निवडणुकीनंतर भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही. या निवडणुकीत राज्याचा निकाल काय लागेल हे सांगणे कठीण आहे. तसे असले तरी बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा पराभव होणार नाही”, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोबाईल घोटाळ्यानंतर आता ३२५ कोटींचा फर्निचर घोटाळा

News Desk

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सोमय्यांवर भडकल्या

News Desk

भाजपचे दक्षिणेतील पहिले मुख्यमंत्री

News Desk