चेन्नई | देशात कोरोनाचा आकडा हा १८ हजारांच्या पुढे गेला आहे. कोरोनाबाबतच्या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पत्रकारांनाही आता कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. काल (२० एप्रिल) मुंबईत ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी ताजी असतानाच आता चेव्वईतून बातमी येत आहे. चेन्नईतील एका न्यूज चॅनलच्या २५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Journalists including me waiting for Corona test in Chennai after 3 journos in the city test positive. pic.twitter.com/iJaR2rxrYm
— J Sam Daniel Stalin (@jsamdaniel) April 20, 2020
या कर्मचाऱ्यांमध्ये कॅमेरामॅन, पत्रकार, आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, याआधी तामिळनाडूत १९ एप्रिलला एका पत्रकाराला लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामूळे राजेश बीला, हेल्थ सेक्रेटरी यांनी ज्या पत्रकारांची परिषदेला उपस्थितीती होती त्या सगळ्यांना चाचणी करण्याचे आवाहन केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.