HW News Marathi
देश / विदेश

सिरीयात पुन्हा रासायनिक हल्ला

नवी दिल्ली | सिरीयामधील अलेप्पो शहरात दहशतवाद्यांकडून पुन्हा रासायनिक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या रासायनिक हल्ल्यात ९ जणांना आपला जीव गमवावा लागला असून ५० हून अधिक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रासायनिक हल्ल्यामुळे येथील नागरिकांना श्वास घेणे देखील कठीण झाले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने सीरियातील या रासायनिक हल्ल्याचे वृत्त दिले आहे. दरम्यान, या रासायनिक हल्ल्यातील जखमींच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती अलेप्पोचे गव्हर्नर हुसेन दियाब यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अवैध खाण प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीचे समन्स

Darrell Miranda

महात्मा गांधी ‘हे’ तुमच्यासाठी ट्रेलर असतील, मात्र आमच्यासाठी ‘ते’ जीवन !

swarit

#PanchayatiRajDiwas | पंतप्रधानांकडून ‘ई-ग्राम स्वराज्य वेबपोर्टल’चे उद्घाटन

News Desk