HW Marathi
देश / विदेश

छत्तीसगडमध्ये चकमक, १० नक्षलवाद्यांना कंठस्नान

छत्तीसगड | छत्तीसगडमधील बीजापूर येथे गुरुवारी (७ फेब्रुवारी) सकाळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी १० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांकडून शोधमोहीम सुरु असतानाच नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करायला सुरुवात केली. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

एसपी मोहित गर्ग यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड्सच्या जवानांनी ही कामगिरी बजावली असून यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. यापूर्वीही झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्यात २९ जानेवारीला नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांच्या चकमकीत ५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले होते.

Related posts

रमजानमध्ये दहशतवाद्यांविरोधी कारवाया थांबवा, मुफ्तींची मागणी

News Desk

डीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी यांचे निधन 

News Desk

मार्क झुकरबर्गला अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी

News Desk