नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी भारतीय न्यायव्यवस्था ही जगातील सर्वात शक्तीशाली न्यायव्यवस्था असल्याचे म्हटले आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आपल्या भाषणात न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने आयोजित केलेल्या निरोप समारंभात सरन्यायाधीश बोलत होते. “श्रीमंत आणि गरिबांचे अश्रू सारखेच असतात”, असेही समाजावर भाष्य करताना ते म्हणाले. सरन्यायाधीश म्हणून हे त्यांचे अखेरचे भाषण होते. त्यांच्यानंतर ३ ऑक्टोबरपासून न्यायमूर्ती रंजन गोगोई हे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी तरुण वकिलांकडेच न्यायव्यवस्था सक्षम करण्याची प्रचंड क्षमता आहे, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. लोकांच्या भूतकाळावरून मी त्यांची पारख करीत नाही. त्यापेक्षा लोकांची कृती आणि दृष्टीकोन लक्षात घेण्याचा मी प्रयत्न करतो. त्यातूनच मी लोकांना पारखतो, असे ते म्हणाले. त्याचबरोबर यावेळी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी देखील दीपक मिश्रा यांचे कौतुक केले आहे. दीपक मिश्रा हे एक असाधारण न्यायाधीश असून त्यांनी नागरिकांचे स्वातंत्र्य जपण्यात नायनाट महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, असे रंजन गोगोई म्हणाले.
I do not judge people by history, I judge people by their activities and their perspectives: Outgoing Chief Justice of India Dipak Misra during his farewell address in Delhi. pic.twitter.com/MSeOx7o9Cu
— ANI (@ANI) October 1, 2018
यावेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी कोलेजिअम सिस्टमचे जोरदार कौतुक केले आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य न्यायाधीश म्हणून व्यतित केले आहे. मी अत्यंत समाधानी आहे, असे म्हणत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी बार असोसिएशनचे आभार देखील मानले. तसेच यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांचाही उल्लेख केला. न्यायमूर्ती गोगोई यांनी दीपक मिश्रा यांच्या दूरदृष्टीचेदेखील कौतुक केले आहे. आता लवकरच न्यायमूर्ती रंजन गोगोई हे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.