बंगळुरु | कर्नाटकातील नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विधानसभेत सोमवारी (२९ जुलै) बहुमत सिद्ध केले आहे. यानंतर मुख्यमंत्री म्हणून येडियुरप्पा यांनी आज (३० जुलै) राज्यात टीपू सुलतान जयंती साजरी करण्यावर बंदी घातली आहे. मुख्यमंत्र्यांनी कन्नड संस्कृती विभागाला यासंदर्भातील आदेश दिले आहे. सरकारच्या या आदेशामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Chief Minister BS Yediyurappa led Karnataka Government orders Kannada & Culture Department, to not celebrate Tipu Jayanti. The decision was taken during yesterday’s cabinet meeting. (file pic) pic.twitter.com/6slPyDaq8w
— ANI (@ANI) July 30, 2019
कर्नाटक सरकारने काल (२९ जुलै) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. कर्नाटकात २०१५ मध्ये तत्कालीन काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने भाजपचा विरोध असताना टीपू सुलतान जयंती धुमधडाक्यात सुरू करण्यात आली. दरम्यान काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळल्यानंतर आता येडियुरप्पा सरकारने टीपू सुलतान जयंती साजरी न करण्याचे आदेश दिले आहेत. १८ व्या शतकात म्हैसूरचा शासक असलेल्या टीपू सुलतान याची जयंती दरवर्षी १० नोव्हेंबरला साजरी केली जाते.
Siddaramaiah, Congress, on cancellation of Tipu Jayanti by Karnataka govt: Since he’s a historical man who fought against Britishers we had decided to celebrate him. Tipu is a man of minority community, BJP is against minorities in this countries. They aren’t secular. I oppose it https://t.co/FARzk8vJ2F
— ANI (@ANI) July 30, 2019
कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी टीपू सुलताना यांच्या जंयतीवर सरकारने घातलेल्या बंदीचा कडाडून विरोध केला आहे. “माझ्या मते टीपू सुलतान यांनी ब्रिटश विरुद्ध लढा देणार देशातील पहिले स्वंतत्र सैनिक आहेत. त्यांची जयंती साजरा करणे हा ऐतिहासिक आमच्या सरकारच्या काळात घेण्यात आला होता. भाजप सरकार देशातील अल्पसंख्याकांच्या विरोधात आहेत. भाजप सरकारची ही वर्तवणूक धर्मनिरपेक्ष नाही. सरकारच्या या निर्णयाला माझा विरोध असल्याचे कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.