पणजी | मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून आज (६ फेब्रुवारी) दुपारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर मनोहर पर्रीकर सायंकाळी सहाच्या सुमारास गोव्यात दाखल झाले आहेत. मनोहर पर्रीकर हे गेल्या गुरुवारी (३१ जानेवारी) गोवा विधानसभा अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये आरोग्याच्या तपासणीसाठी गेले होते.
Press Release-Chief Minister Shri @manoharparrikar has arrived in Goa today (06/02/2019) after completing his scheduled medical review/check-up in New Delhi.
— CMO Goa (@goacm) February 6, 2019
पाच ते सहा दिवस पर्रीकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यावेळी त्यांच्या डॉक्टरांनी विविध चाचण्या करण्यात आल्या. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिका-याने सांगितले आहे. पर्रीकरांना भेटण्यासाठी एम्समध्ये जे खासदार गेले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.