उत्तर प्रदेश | हाथरस येथे मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर योगी सरकारवर टीका सुरू झाल्या. तर प्रशासनाकडून पीडित कुटुंबीयांना दिलेल्या वागणुकीवरून या प्रकरणाचे गूढ आणखीनच वाढले. त्यात भर म्हणून पीडित मुलीवर बलात्कार झालाच नसल्याचा दावा उत्तर प्रदेशचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी केला आहे. त्यामुळे, एकूणच प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र, आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आले आहे.
तसेच, या घटनेतील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले. एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. कुटुंबीयांचे जवाब देखील नोंदवून घेण्यात आलेले आहे. असे या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अवस्थी म्हणाले होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट अखेर घेतली आहे. अन्यायाविरोधात लढाई सुरूच राहील, जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नाही. काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. पीडित कुटुंबाचा आवाज कुणीही दाबू शकत नसल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.
Chief Minister Yogi Adityanath orders Central Bureau of Investigation (CBI) probe into the #Hathras case: Chief Minister's Office (CMO) (File pic) pic.twitter.com/VVvf2M6hRc
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.