HW Marathi
देश / विदेश राजकारण

चीनचा भारतीय सैन्यावरील हल्ला पूर्वनियोजित, सरकार झोपा काढत होते काय ?

मुंबई | भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या २० जवान शहदी झाले. या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दुसऱ्यांदा प्रश्न विचारत घेरले आहे. “भारताच्या गलवान खोऱ्याच्या चीनने भारती सैन्यावर केलाला हल्ला हा पूर्वनियोजित होता.  मात्र, भारत सरकार यावेळी झोप काढत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते,” असे ट्वीट करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

राहुल गांधी म्हणाले, “भारताच्या गलवान खोऱ्याच्या चीनने भारती सैन्यावर केलाला हल्ला हा पूर्वनियोजित होता.  मात्र, भारत सरकार यावेळी झोप काढत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. भारत सरकारच्या सरकारच्या हलगर्जीपणमुळे आपल्या जवान शहदी झाले. ” तसेच राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटसोबतच एएनआयचे एक वृत्तही ट्विट केले आहे. यात, संरक्षण राज्य मंत्री श्रीपद नाईक यांचे वक्तव्य आहे. चीनने केलेला हा हल्ला आधीपासूनच नोयोजित होता, असे श्रीपद नाइक यांनी एएनआयशी बोलताना मान्य केले आहे. तसेच भारतीय लष्कर चीनला चोख उत्तर देईल, असे म्हटले होते.

भारत-चीन मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१९ जून) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यात राजकीय पक्षांचे अध्यक्ष सहभागी होणार आहेत. या बैठकीत, चीनसोत सुरू असलेला वाद आणि सद्य स्थितीवर चर्चा होणार आहे. ही सर्वपक्षीय बैठख सायंकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पद्धतीने होणार आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत.

 

Related posts

सरकार, प्रशासन यांची एकजूट व भावनेचा ओलावाच दुष्काळाशी सामना करू शकेल !

News Desk

 देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला,शरद पवारांची मिष्किल टिप्पणी 

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा

News Desk