HW Marathi
कोरोना देश / विदेश

अखेर ! चीनच्या हुबेई प्रांताने लाॅकडाऊननंतर आज घेतला मोकळा श्वास !

चीन | कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लाॅकडाऊन जाहीर केले आहे,तोपर्यंत घराच्या बाहेर येऊ नका अशा सुचना दिल्या गेल्या आहेत. आता भारतात एकीकडे लाॅकडाऊन जाहीर झाले असताना ‘कोरोना विषाणू’च्या प्रसाराला जिथून सुरुवात झाली, त्या चीनमधील हुबेई प्रांतातील लाॅकडाऊनआज (२५ मार्च) ला हटवण्यात आले आहे.  तब्बल ६० दिवसांनंतर या प्रांताचे ‘कुलूप’ काढण्यात आले आहे.

चीनच्या वुहानमध्ये गतवर्षी ३१ डिसेंबरला पहिला कोरोनाचा रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर चीनमध्ये कोरोनामुळे हाहाःकार माजला होता. वुहानमध्ये अदयापही लाॅकडाऊन आहे. मात्र गेल्या पाच दिवसात हुबेईमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही. सहा कोटी लोकसंख्या असलेल्या हुबेई प्रांतात सर्व मेट्रो स्टेशन, बस, रेल्वे स्थानक निर्जंतुक केली गेली. डिसेंबरनंतर पहिल्यांदा म्हणजे 90 दिवसांनी हुबेईकर नागरिक मोकळा श्वास घेतील. परंतु हुबेईची राजधानी वुहानमध्ये 23 जानेवारीला लागलेले टाळे 8 एप्रिलला उघडणार आहे.

Related posts

‘चांद्रयान-२’ने पार केला महत्त्वाचा टप्पा, भारताची चंद्राच्या दिशेने आगेकूच सुरू

News Desk

देशातील तरुणांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मंत्राचे कायम स्मरण ठेवावे !

अपर्णा गोतपागर

पुलावामा जिल्ह्यात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक

News Desk