नवी दिल्ली | चीनच्या दोन हेलिकॉप्टर्सने सप्टेंबरला लडाखमध्ये घुसखोरी केली होती. चीनचे हेलिकॉप्टर दहा मिनिटे भारताच्या हवाई हद्दीत फिरत असल्याचे आढळले होते. त्यानंतर आता पुन्हा चीनच्या हेलिकॉप्टरने भारतात घुसखोरी केली असल्याची माहिती समोर आली आहे. २७ सप्टेंबरला चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हेलिकॉप्टरने भारतातील लडाखच्या ट्रिग हाइट्स परिसरात घुसखोरी केली होती.
Aerial transgression by two Chinese helicopters took place on September 27 in Ladakh Trig Heights. Both the helicopters remained in Indian territory for about ten minutes and then went back: Sources
— ANI (@ANI) October 25, 2018
चीनने बऱ्याचदा भारतात घुसखोरी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मार्चमध्ये चारवेळा चीनच्या सैनिकी हेलिकॉप्टर भारताच्या सीमेवर आल्याची माहिती गुप्तचर खात्याने माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशात चीन लष्कराने पुन्हा भारत घुसखोरी केली होती. त्यानंतर भारताचे जवानांनी त्यांच्या घुसखोरीवर विरोध केल्यावर चीनने माघार घेतली आहे. त्याआधी उत्तराखंडमधील बाराहोती, ट्रिग हाइट्स आणि लडाखमधील देपसंग खोऱ्यात चिनी जवानांनी घुसखोरी केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.