HW News Marathi
देश / विदेश

छिंदमचे वकील पत्र स्वीकारणाल्याच्या अफवामुळे वकिलाला त्रास

अहमदनगर – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम प्रकरणाचा त्रास अॅड सुरेश सोरटे यांना होत आहे. सोरटे यांनी छिंदमचे वकिल पत्र स्वीकारल्याचे खोटी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सोरटे यांचा मोबाईल नंबर दिला आहे. त्यामुळे लोक त्यांना फोनकरुन शिवीगाळ आणि धमकी देत असल्यामुळे त्यांना मनस्ताप होत आहे.

माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलल्यामुळे भाजपमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. या घटनेनंतर नगर पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आले. बार असोसिएशनने छिंदम यांचे वकील पत्र न घेण्याचा ठराव पास केला होता. त्यानंतर सोरटे यांनी छिंदम यांचे वकील पत्र घेतल्याची खोटी पोस्ट व्हायरल झाली होती.

त्यामुळे सोरटे यांना त्रास सहन करावा लागला. अतिरीक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी या पोस्ट विरुद्ध कारवाईची मागणी सोरटेंनी केली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आराध्य दैवत आहे. त्यामुळे मी छिंदम यांचे वकील पत्र घेणार नाही,’ असे मत अॅड सुरेश सोरटे व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पद्मावत’ सिनेमाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा झेंडा

News Desk

2 इंचांमुळे असे काही घडले, त्याला पाच लाख मोजावे लागले

News Desk

#PulwamaAttack : माझ्या दुसऱ्या मुलालाही सीमेवर पाठवेन, परंतु पाकिस्तानला धडा शिकवा !

News Desk