मुंबई | भारत आणि चीनमधी सैन्य मागे घेण्यास सहमती दर्शविली आहे. भारत आणि चीन या दोन देशात काल (२२ जून) कमांडर स्तरावरील बैठकीदरम्यान महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व लडाखमधून दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यावर सहमती झाली आहे. भारत-चीन सीमेवर काल जवळ ११ तास कमांडर स्तरावर चर्चा सुरू होती. सीमेवरून आपले सैन्य मागे घेण्यावरून दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. चीनसोबत झालेल्या बैठकीनंतर भारतीय लष्कराने माहिती दिली आहे.
Chinese and Indian border troops held commander-level meeting on Monday, first since the two sides clashed on June 15 at #GalwanValley, showing that both sides hope to properly handle differences through dialogue and consultation: Global Times quotes Chinese Foreign Ministry
— ANI (@ANI) June 23, 2020
गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी केलेल्या हिंसक हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर दोन्ही देशात तणाव वाढला होता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काल भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावरील बैठक पार पडली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) ५ मेच्या पूर्वी जशी स्थिती होती तशीच स्थिती आताही असावी असे भारताने या चर्चेदरम्यान चीनसमोर स्पष्ट केले. दोन्ही पक्षांदरम्यान, त्याच जागी ६ जून या दिवशी दोन्ही देशांदरम्यान लेफ्टनंट जनरल स्तरावरील पहिली बैठक पार पडली होती. त्या बैठकीत दोन्ही पक्षांमधील समस्या दूर करण्यासाठी एक करार करण्यात आला. दरम्यान, १५ जूनला झालेल्या हिंसक घटनेनंतर सीमेवरील परिस्थिती बिघडली. याचे कारण म्हणजे दोन्ही पक्षांनी ३,५०० किमीच्या प्रत्यक्ष सीमेजवळील अधिकांश क्षेत्रात आपले सैन्य अधिक प्रमाणात तैनात केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.