नवी दिल्ली । पूर्व-लडाखमधील भारत-चीन सीमासंघर्ष निवळण्याची आता काही स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. भारत-चीनच्या सैन्यामध्ये १५ जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेनंतर सीमाभागात अत्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या झडपेत भारताचे तब्बल २० जवान शहीद झाले त्यामुळे गेल्या काळात भारत-चीनचे हे संबंध ताणले गेले. मात्र, आता चीन यातून काहीशी माघार घेताना दिसत आहे. गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य आता २ किमीपर्यंत मागे गेल्याचे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे.
Chinese Army has moved back tents, vehicles & troops by 1-2 km from locations where disengagement was agreed upon at Corps Commander level talks: Indian Army Sources pic.twitter.com/hamcQRaCMo
— ANI (@ANI) July 6, 2020
“गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैन्यामध्ये ज्या ठिकाणी हिंसक झडप झाली त्या भागापासून २ किमीपर्यंत चिनी सैन्य मागे सरकल्याचे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे, या भागात उभारण्यात आलेली तात्पुरत्या स्वरुपाची बांधकामे हटवण्याचे काम देखील दोन्ही देशांकडून सुरू आहे”, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने दिल्याचे वृत्त आहे. देशात चीनविरुद्ध वातावरण चांगलेच पेटलेले असताना आता चीनकडून घेण्यात आलेली ही माघार निश्चितच चर्चेचा विषय आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, अद्याप केंद्र सरकारकडून असे कोणतेही अधिकृत वृत्त वा माहिती देण्यात आलेली नाही.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.