नवी दिल्ली | इंडो तिबेटियन पोलीस दल म्हणजेच आयटीबीपीच्या एका अहवालातून चीनच्या सैन्याकडून गेल्या महिन्यात तीन वेळा भारताच्या सीमारेषेत केल्या गेलेल्या घुसखोरीची माहिती पुढे आली आहे. भारतीय हद्दीत तब्बल चार किलोमीटरपर्यंत चीनच्या सैन्यांनी घुसखोरी केली असल्याची माहिती या अहवालात उघड झाली आहे. १४ आणि १५ ऑगस्ट म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यदिनी चिनी सैन्याने भारतीय हद्दीत प्रवेश केला होता अशी अत्यंत धक्कादायक माहिती या अहवालातून मिळाली आहे.
China's People Liberation Army transgressed the Line of Actual Control at least thrice last month in Uttarakhand, as per sources
Read @ANI Story | https://t.co/mWKMUWPTpN pic.twitter.com/zUwZHWihuC
— ANI Digital (@ani_digital) September 12, 2018
चीनचे सैन्य आणि काही नागरिक बाराहोतीच्या रिमखिम पोस्टपर्यंत पोहोचले होते. चिनी सैन्याने भारतीय हद्दीत तब्बल ४ किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती. उत्तराखंडच्या बाराहोती भागात सर्वप्रथम चिनी सैन्याने ६ ऑगस्टला घुसखोरी केली होती. त्याचप्रमाणे संपूर्ण देशात ज्यावेळी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात होता त्यावेळी चिनी सैनिक भारतीय हद्दीत होते, ही एक अत्यंत धोकादायक बाब आहे. मात्र यानंतर आयटीबीपीच्या जवानांनी चिनी सैन्याला विरोध करत त्यांना रोखले होते . त्यामुळे चिनी सैन्याने माघार घेतली आणि नागरिकांसह पुन्हा सीमेच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.