HW News Marathi
देश / विदेश

मुंबईत पुन्हा पेट्रोल १८ तर डिझेल ३१ पैशांनी महाग

नवी दिल्ली | मागील आठवड्यातील केंद्र आणि राज्य सरकारच्या इंधन कपातीनंतर इंधनाच्या दरात पुन्हा प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. विशेषतः दिल्ली आणि मुंबईत इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रति लिटर ८८.१२ रुपये आणि डिझेलचा दर प्रति लिटर ७८.८२ रुपये एवढा झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या कर कपातीचा फायदा ग्राहकांना प्रत्यक्षात घेता आलाच नाही. त्यामुळे सरकारने सर्व सामान्यांची फसवणूक केली असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.

मुंबईत काल (शुक्रवारी) पेट्रोल १८ पैसे तर डिझेल ३१ पैसे प्रति लिटरने महागले आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे ८२.६६ रुपये आणि डिझेलचे प्रति लिटर ७७.१९ रुपये एवढे महागले आहे. मात्र सततच्या दरवाढीमुळे पेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. तर डिझेलने ८०चा आकडा ओलांडला आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळात वाढत असलेल्या महागाई विरोधात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. देशभऱातली २१ पक्षांनी या बंदला पाठिंबा देत आपला सहभाग आणि समर्थन दर्शविले होते. परंतु, याचा कोणताही परिणाम इंधन दरवाढीवर झालेला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या इंधन कपातीनंतरही देशात इंधन दरवाढ पुन्हा दर दिवशी वाढत आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल १८ पैसे तर डिझेल २९ पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसींना मोठा दिलासा

News Desk

दिल्लीतल्या मोदी-ठाकरे भेटीनंतर महाराष्ट्रातही भाजपच्या नेत्यांनी बोलवली बैठक

News Desk

‘लॉकडाऊन’संदर्भातील ‘ते’ ट्वीट अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले डिलीट

News Desk