HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्या पत्नी चिन्ना दुआ यांचं निधन

दिल्ली | एचडब्ल्यू न्यूजचे सल्लागार संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्या पत्नी डॉ. पद्मावती दुआ(चिन्ना दुआ )यांचे काल (११ जून) रात्री निधन झाले. चिन्ना दुआ या ५६ वर्षांच्या होत्या. अलीकडेच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

या कठीण परिस्थितीत एचडब्ल्यू न्यूज कुटुंब विनोद दुआ आणि त्यांच्या कुटूंबियांसमवेत उभा असून आम्ही चिन्ना दुआ यांना अभिवादन करतो. तसेच, आम्ही विनोद दुआ यांनाही सुदृढ आरोग्य मिळावे अशी प्रार्थना करतो.

चिन्ना दुआबरोबरच विनोद दुआ यांनाही मे महिन्यात कोरोना झाला होता. त्यानंतर दोघांनाही गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.. जिथे दोघांवर उपचार चालू होते. विनोद दुआव्यतिरिक्त त्यांची मुलगी मल्लिका दुआ यांनाही कोरोना झाला होता. सोशल मीडियावर त्या सतत त्यांची आणि त्यांच्या पालकांच्या प्रकृती बाबत माहिती देत होत्या.

मल्लिका यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, ‘माझी कोरोना टेस्ट झाली आहे, ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. माझी इथे चांगली काळजी घेतली जात आहे. आधीपेक्षा मला बरं वाटत आहे.

मल्लिका यांनी त्यानंतर अलीकडेच त्यांच्या पालकांच्या आरोग्याची एक पोस्ट शेअर केली होती. मल्लिकाने लिहिले की, ‘आईला अॅकमो प्लस व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. ती बेशुद्ध आहे आणि दररोज संध्याकाळी आम्ही तिला कॉल करतो. पापण्या झपकुन ती आपली प्रतिक्रिया देते. आत्ता त्याच्या फुफ्फुसांना संपूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे. तुम्ही सर्वांनी तिच्यासाठी प्रार्थना करावी, अशी पोस्ट केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन : पाकच्या २ सैनिकांचा खात्मा तर १ जवान शहीद

News Desk

राहुल गांधींची राफेल कराराच्या किंमती संदर्भातील सर्व वक्तव्ये खोटी | अरुण जेटली

News Desk

साताऱ्याच्या प्रवीण जाधवचं ऑलिंपिकसाठी निवड, पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक

News Desk