पाटणा | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणातील सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्या,अशी विनंती केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे पुत्र आणि लोकशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्राद्वारे केली आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत आलेल्या बिहारमधील पोलिस अधिकाऱ्यांना चुकीची वागणूक दिल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची विनंतीही पासवान यांनी केली आहे.
Lok Janshakti Party leader Chirag Paswan has written to Bihar CM Nitish Kumar requesting him to order CBI inquiry in Sushant Singh Rajput death case. Paswan also requests him to speak with PM & Maharashtra CM on "misconduct" with Bihar Police officer in Mumbai to probe the case.
— ANI (@ANI) August 4, 2020
“बिहारमध्ये दाखल केलेला खटला सीबीआयकडे द्यावा ती संधी आपल्याकडे आहे. कारण सध्या बिहार आणि महाराष्ट्र पोलिस दोघेही या प्रकरणाचा तपास करत आहेत, पण जर चौकशी महाराष्ट्र सरकारकडे सोपवली गेली तर ती सीबीआयकडे वर्ग करण्याची संधी बिहार सरकारच्या हातातून निघून जाईल” असे चिराग पासवान यांनी पत्रात लिहिले आहे. नितीशकुमार यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केल्याची माहिती आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला आता ५० दिवस उलटून गेले आहेत, मात्र अद्यापही त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे हे अस्पष्ट आहे. सत्य बाहेर न आल्याने बिहार, तसेच देश आणि जगभरातील त्याचे चाहते संतप्त आणि निराश झाले आहेत. सत्य लवकरात लवकर उघड व्हावे, यासाठी सीबीआय चौकशीची मागणी त्याचे चाहते करत आहेत” असेही पासवान म्हणाले. सुशांतच्या मृत्यूनंतर आठवड्याभरातच चिराग पासवान यांनी सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशीची मागणी केली होती. बॉलिवूडमधील गटबाजीवर प्रकाश टाकणारे एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.