HW Marathi
देश / विदेश

न्यूझीलंडमध्ये अंदाधुंद गोळीबार हत्याकांडानंतर सेमी ऑटोमॅटीक रायफल्सच्या विक्रीवर बंदी

मुंबई | न्यूझीलंडमध्ये अंदाधुंद गोळीबार हत्याकांडात ४९ जणांचा मृत्यू झाला होता. या हत्याकांडाने संपूर्ण जग हद्दरून गेले होते. यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न यांनी देशभरात लष्करी वापराच्या सर्वच हत्यारांच्यावर आणि सेमी ऑटोमॅटीक रायफल्सच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच सर्व प्रकारच्या सेमी ऑटोमिक रायफल्स उच्चक्षमतेची मॅग्झिन्सवरही आणि त्याच्या काडतूसांवर बंदी घालण्याची घोषणा त्यांनी केली. कोणतेही शस्त्र जीवघेणे आणि घातक ठरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवा कायदा ११ एप्रिलपर्यंत आणणार असल्याचे अर्डर्न यांनी सांगितले.

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च शहरात शुक्रवारी (१५ मार्च) दोन मशिदीत मोठा हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४९ जण ठार झाले होते. २० हून अधिक जखमी झाले होते. त्यावेळी हा हल्ला अतिरेक्यांनी केला असून न्यूझीलंडमधील हा काळा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैसिंडा यांनी दिली होती.

न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारीत सात भारतीयांचाही मृत्यू झाला होता. मृतांमध्ये हैदराबादमधील दोन, केरळाची एक महिला आणि गुजरातमधील चार व्यक्तींचा समावेश होता. अन्य तीनजण भारतीय वंशाचे होते. त्यापैकी दोन गुजरात आणि एक तेलंगणातील होता.

या हत्याकांडावेळी न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू अल नूर मशिदीत जात असताना ही गोळीबाराची घटना घडली. परंतु सुदैवाने क्रिकेट संघातील खेळाडू सुखरूप बाहेर पडून बचावले होते. बांगलादेश क्रिकेट मंडळाने आपल्या टीमला दौरा रद्द करून माघारी बोलावले होते.

Related posts

कोलकातामधील माजेरहाट पूल कोसळला

News Desk

शबरीमला मंदिराचे दरवाजे महिलांसाठी उघडणार ?

अपर्णा गोतपागर

निवडणुकीत गुन्हेगार नेत्यांवर बंदी ?

अपर्णा गोतपागर