HW News Marathi
देश / विदेश

ICICI च्या चंदा कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत गोत्यात

मुंबई | आयसीआयसीआय बँकेचे मुख्याधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्यावर व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआयने लुकआऊट नोटीस पाठवले आहे. यामुळे कोचर दाम्पत्य आणि वेगुगोपाल धूत यांना देशाबाहेर जाता येणार नाही.

व्हिडीओकॉन समुहा व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी २००८ मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरू केली होती आणि आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळताच धूत यांनी अवघ्या ९ लाख रुपयांमध्ये दीपक कोचर यांना ती कंपनी विकल्याचे समोर आले आहे. न्यू पॉवर रिन्यूएबल्स (एनआरपीएल)चे सर्व मालकी हक्क दीपक कोचर यांच्याकडे आले.

जानेवारी २००९मध्ये वेणुगोपाल धूत एनआरपीएलच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आणि कंपनीचे शर्स २.५ लाख रुपयामध्ये कोचर यांना विकले. मार्च २०१९मध्ये न्यू पॉवरला धूत यांची मालकी असलेल्या सुप्रीम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून ६४ कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले. यानंतर मार्च २०१०मध्ये न्यू पॉवरमधील ९४.९९ शेअर्सचा वाटा सुप्रीम पॉवरकडे गेला. धूत यांच्या मालकीच्या सुप्रीम एनर्जी नावाच्या

या दरम्यान २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनला ३२५० कोटींचे कर्ज दिले. या कर्जातील २८४९ कोटी रुपयांची अद्याप थकबाकी आहे आणि आता बँकेनं हे कर्ज एनपीए अर्थात बुडीत कर्ज म्हणून जाहीर केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसची मोदी सरकारविरोधात ‘भारत बचाव रॅली’

News Desk

“कलम ३७० रद्द करुनही जम्मू-काश्मीरची समस्या सुटलेली नाही” – मोहन भागवत

News Desk

विमानात मिळणार इंटरनेट, वायफाय

swarit