HW News Marathi
देश / विदेश

अरुण जेटली कुणाला म्हणाले “विनोदी राजकुमार”?

नवी दिल्ली | अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. राफेल करार आणि नॉन परफॉर्मिंग असेट्ससंबंधी बोलताना जेटली यांनी राहुल गांधी यांना क्लाउन प्रिन्स म्हणजेच विनोदी राजकुमार असे संबोधणारी एक फेसबुक पोस्ट केली आहे. राहुल गांधी यांनी राफेल करार आणि एनपीए संदर्भात केलेल्या आरोपांना फेसबूक पोस्टच्या माध्यमातून जेटली यांनी उत्तर दिले आहे.

https://www.facebook.com/notes/arun-jaitley/falsehood-of-a-clown-prince/882187241969825/

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे तसेच राफेल डील आणि उद्योजकांना अडीच लाख कोटी कर्ज दिल्याप्रकरणी अपप्रचार करीत आहेत,असा आरोप देखील जेटली यांनी केला आहे. “राहुल गांधी यांचा राफेल करारासंबंधित प्रत्येक शब्द खोटा आहे. त्याचप्रमाणे त्यांचे असे उघडपणे बोलणे हे धोकादायक आहे. हे काही लाफ्टर चॅलेंज नाही,” अशा खोचक शब्दात जेटली यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे.

याआधीही राफेल करारवरून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी “राहुल गांधींनी सुरु केलेला वाद हा अत्यंत बाळबोध असून ह्यावरूनच त्यांची समजून घेण्याची क्षमता किती कमी आहे हे लक्षात येते,” अशा शब्दात राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. राफेल करारासंदर्भात राहुल गांधींनी राफेल कराराच्या किमतीसंदर्भात केलेले प्रत्येक वक्तव्य खोटे असल्याचेही अरुण जेटली यांनी सांगितले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंग्लंडच्या राजपुत्राला डब्बेवाल्यांकडून कंबरपट्टा, तोडे आणि वाळ्यांची भेट

News Desk

यंदाचे पद्म पुरस्कार कोणाला मिळणार? मोदींनी दिलं स्पष्टीकरण

News Desk

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ऑनलाईन मतदानाची सुविधा उपलब्ध नाही

News Desk