HW Marathi
देश / विदेश

कमांडर अभिनंदन भारतात परतल्यानंतर ‘ही’ असेल पुढील प्रक्रिया

नवी दिल्ली | पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान तब्बल ६० तासांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर शुक्रवारी (१ मार्च) मायभूमीत सुखरूप परतले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) पाकिस्तानच्या संसदेत याबाबतची घोषणा केली होती. त्याप्रमाणे पाकिस्तानने कमांडर अभिनंदन यांची बिनशर्त मुक्तता केली. संपूर्ण देश कमांडर अभिनंदन यांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. त्यामुळे अभिनंदन यांचे मायभूमीत सुखरूप परतलेले पाहणे हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. दरम्यान, आता अभिनंदन भारतात परतल्यानंतर या पुढची प्रक्रिया देखील बरीच मोठी आणि खडतर असणार आहे.

कमांडर अभिनंदन भारतात परतल्यानंतर पुढील प्रक्रिया काय असेल ?

  • कमांडर अभिनंदन यांची शनिवारी (२ मार्च) डीब्रिफिंग होईल. भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी पाकिस्तानात घालवलेल्या वेळेबद्दल चौकशी करण्यात येईल. भारतीय वायुदलाच्या नियमांनुसार ही डीब्रिफिंग होणे अनिवार्य असते. शत्रूंनी आपल्याला जवानाला त्यांच्या सैन्यात तर सामील करून घेतले नाही ना ? काही गुप्त माहिती सांगितली तर नाही ना ? यासाठी ही चौकशी केली जाते. आयडी (इंटेलिजेंस ब्यूरो) आणि रॉकडून (रिसर्च अँड अनॅलिसिस विंग) विंग कमांडर यांची चौकशी होईल.

 

  • भारतात परतलेले भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची दिल्ली संपून वैद्यकीय तपासणी होणार आहे. अभिनंदन यांची सायकॉलॉजिकल टेस्ट देखील होईल. यामध्ये त्यांची मानसिक स्थिती कशी आहे? याची माहिती काढली जाईल.

 

  • वैद्यकीय तपासणीनंतर अभिनंदन यांची संपूर्ण स्कॅनिंग होईल. पाकिस्तानच्या सैन्याने कोणत्या प्रकारचा ‘बग’ बसविला आहे का ? हे जाणून घेण्यासाठी ही स्कॅनिंग केली जाते. अभिनंदन यांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी सायकॉलॉजिकल टेस्ट देखील करण्यात येईल.

Related posts

एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या

News Desk

तमिळनाडूत जलिकट्टूदरम्यान २ जणांचा मृत्यू

News Desk

चारित्र्यहनन करुन आरक्षणाच्या मुळ मुद्याला बगल देता येणार नाही- हार्दिक पटेल

News Desk