HW Marathi
देश / विदेश

सोशल मीडियावर कमांडर अभिनंदन यांच्या लूकची जोरदार चर्चा

नवी दिल्ली | पाकिस्तानच्या ताब्यातून मायदेशी सुखरुप परतलेले विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याची, धैर्याची, संयमाची चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे. मात्र, सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल याचा काही नेम नाही. अभिनंदन यांच्या शौर्यासोबतच सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे ती अभिनंदन यांच्या मिश्यांची. “मुछे हो तो कमांडर अभिनंदन जैसी”, अशी प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहे. अनेक जण आता हुबेहूब अभिनंदन यांच्यासारख्या मिशा ठेऊ लागले आहेत.

“कमांडर अभिनंदन यांची जबरदस्त कामगिरी ऐकून मी त्यांचा फॅन झालो. तेच खरे हिरो आहेत. मला त्यांची स्टाईल प्रचंड आवडली. म्हणूनच मी त्यांच्यासारखी मिशी ठेवली,’ असे बंगळुरुतील मोहम्मद चंद म्हणतो. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढले. त्यानंतर भारतीय वायू दलाकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आपल्या क्षमतेचे दर्शन घडविण्यासाठी भारताच्या हवाई हद्दीत शिरून गोळीबार केला.
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना परतवून लावताना भारतचे मिग-२१ विमान पडले आणि भारतीय वायू दलाचे कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या हाती लागले. भारताची कठोर कारवाई आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने शांततेच्या प्रस्तावाचे कारण पुढे करत कमांडर अभिनंदन यांची सुटका करण्यात आली. संपूर्ण देश कमांडर अभिनंदन यांच्या घरवापसीसाठी प्रार्थना करत होता. कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याची जितकी प्रशंसा झाली तितकीच आता त्यांच्या हटके लूकची चर्चा देखील सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

Related posts

लोकसभेचे वेळापत्रक आज सायंकाळी जाहीर होणार  

News Desk

भारतीय सुरक्षा यंत्रणांनीच बनावट पासपोर्ट बनवून दिला – छोटा राजन

News Desk

नोएडामधील पार्कात नमाज पठण करण्यास पोलिसांची मनाई

News Desk