HW News Marathi
देश / विदेश

शिस्तीबद्दल भाष्य केले कि हुकूमशहा समजले जाते | पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली | हल्ली शिस्तीबाबत भाष्य केल्यास हुकूमशहा किंवा लोकशाहीविरोधी समजले जाते, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. पंतप्रधान मोदी हे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्यावरील ‘मूव्हिंग ऑन… मूव्हिंग फॉरवर्ड: अ ईयर इन ऑफिस’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मोदींनी यावेळी शिस्तीबद्दल बोलताना काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधला. या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, आनंद शर्मा तसेच काँग्रेसचे अन्य काही नेते देखील उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी वैंकय्या नायडू हे अतिशय शिस्तप्रिय व्यक्ती असल्याचे म्हणत त्यांचे कौतुकही केले.”व्यंकय्याजींच्या हृदयात शेतकरी वसला आहे. जेव्हा अटलजी व्यंकय्याजींना मंत्रीपद देऊ इच्छित होते त्यावेळी त्यांनी आपल्याला ‘ग्रामीण विकास मंत्रालय’ हवे असल्याचे सांगितले. शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतः ला वाहून घेतले आहे”, असे म्हणत मोदींनी वैंकय्या नायडू यांची प्रशंसा केली. सभागृह नीट चालू दिले असते तर नायडू यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली नसती, असे मोदी म्हणाले. यावेळी अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालू न देण्यावरून मोदींनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर टीका केली.

 

 

 

Related posts

देशाचे लॉकडाऊन २१ दिवसांपेक्षा जास्त वाढणार नाही, केंद्राचे स्पष्टीकरण

News Desk

कोरोनामुळे अर्थचक्र चिखलात रुतले, अर्थव्यवस्था ढासळून नये म्हणून काही सवलती देत आहोत !

News Desk

शिवसेनेच्या नाराजीमुळे बराक ओबामाला झोप लागत नसेल ! निलेश राणेंचा टोला

Gauri Tilekar