HW News Marathi
देश / विदेश

धावत्या ट्रेनसोमर सेल्फी घेण्याचा स्टंट फसला

हैदराबाद | आपण सर्वजण दिवसभरात अनेक सेल्फी काढतो. पण, या सेल्फी कुठे, कधी आणि केव्हा काढायचे हे आपणच ठरविले पाहिजे. हैदराबाद मधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. सेल्फीच्या नादात हा ट्रेनच्या अगदी जवळ गेला असून त्याला ट्रेनचा अंदाज आला नाही. ट्रेनने या तरुणाला मागून धडक दिली असून या घटनेत हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे.

ही घटना हैदराबादमधील भरतनगर रेल्वे स्थानकावर घडली असून ही घटना तीन दिवसापूर्वी घडली असल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनी दिली आहे. या व्हिडिओत दिसणारा तरुण हैदराबादमधील असून याचे नाव शिव असे आहे. या तरुणांनी धावत्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता. हा तरुण रेल्वे रुळाच्या अगदी बाजूला होता. याने जीव धोक्यात घालून सेल्फी काढत होता.

त्यांला त्याच्या मित्राने सेल्फी घेण्यापासून रोखले होते. पण, तरी देखील शिवने त्यांचे ऐकले नाही. सेल्फी घेताना ट्रेननी दिलेल्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तीन दिवस बँका सुट्टीवर

News Desk

बलात्कार्यांना २१ दिवसांत फाशी ‘महाराष्ट्रात राबवणार ‘आंध्र पॅटर्न’

News Desk

शबरीमाला प्रकरण हे संघ-भाजपचे मोठे कारस्थान !

Gauri Tilekar