HW News Marathi
Covid-19

चिंताजनक ! देशात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात, आयएमएने दिली माहिती 

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. चिंतेचे वातावरण आणखी वाढत चालले आहे. दरम्यान, आयसीएमआरने देशात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली नाही असे म्हटले होते. मात्र, आयएमएने भारतातील कोरोनाच्या संसर्गाबाबत चिंताजनक माहिती दिली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती बिघडली असून, देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे, अशी माहिती दिली आहे.

आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे चेअरपर्सन डॉ. व्ही. के. मोंगा यांनी सांगितले की, देशातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. ही बाब खूप चिंताजनक आहे. देशात दररोज ३० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. ही परिस्थिती खूप वाईट आहे. आता कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. हे खूप वाईट संकेत असून, देशात समूह संसर्ग झाल्याचे दिसत आहे.

आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजेच समूह संसर्ग सुरू असल्याचे प्रथमच मान्य केले आहे. देशातील वाढती रुग्ण संख्या आणि त्यात आता आयएमएने कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झाल्याचे मान्य केल्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. तसेच देशातील मध्यप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, ओडिशा यांसारख्या राज्यात साथीचे आजारही वाढत चालले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

News Desk

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

News Desk

गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावंस वाटलं, पण…! अजित पवारांची नाराजी

News Desk