नवी दिल्ली | काँग्रेस पक्षाकडून प्ले स्टोरमधून पक्षाचे अॅप हटवण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरी होत असल्याचा आरोप भाजपने केला होता. या अॅपच्या सिंगापूर येथील सर्व्हरमधून ही माहिती चोरी होत असल्याचे भाजपने म्हटले होते. त्यानंतर प्ले स्टोर मधून पक्षाचे अॅप्लिकेशन काढून टाकण्यात आले.
तसेच भाजपचे नॅशनल आयची सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ‘हाय मी राहुल गांधी आहे, मी देशाच्या जुन्या पक्षाचा अध्यक्ष आहे. जेव्हा तुम्ही आमच्या अॅपचा वापर करता, तेव्हा मी तुमचा डेटा सिंगापूर मधील माझ्या मित्रणा देतो.’
Hi! My name is Rahul Gandhi. I am the President of India’s oldest political party. When you sign up for our official App, I give all your data to my friends in Singapore. pic.twitter.com/ceCTkod17D
— Amit Malviya (@amitmalviya) March 26, 2018
रविवारी राहुल गांधी यांनी ट्विट करत ‘मी नरेंद्र मोदी, मी भारताचा पंतप्रधान आहे. तुम्ही आमच्या अधिकृत अॅपवर साईन अप करतात. तेव्हा तुमचा पुर्ण डेटा अमेरिक येथील माझ्या कंपनीला देतो.’
Hi! My name is Narendra Modi. I am India's Prime Minister. When you sign up for my official App, I give all your data to my friends in American companies.
Ps. Thanks mainstream media, you're doing a great job of burying this critical story, as always.https://t.co/IZYzkuH1ZH
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 25, 2018
नमो अॅप वापरणाऱ्या असंख्य भारतीयाचा डेटाचा गैरवापर केला जात असल्याचा दावा इलियट एल्डरसन फ्रेंच हॅकरने केल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटकरुन अमेरिक कंपनीला पाठवत असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटबरोबर एका इंग्रजी वेबसाईटची बातमी सुद्धा शेअर केली आहे. तसेच #DeleteNaMoApp करुन ट्विट केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.