नवी दिल्ली | भारताची महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान २’चे आज (२२ जुलै) दुपारी २.४३ वाजता आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान २ या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक व्यक्तींने इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. परंतु काँग्रेसने चांद्रयान – २ या मोहितमेच्या यशाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे.
This is a good time to remember the visionary move of India’s first PM Pandit Jawaharlal Nehru to fund space research through INCOSPAR in1962 which later became ISRO. And also Dr. Manmohan Singh for sanctioning the #Chandrayan2 project in 2008. pic.twitter.com/2Tje349pa0
— Congress (@INCIndia) July 22, 2019
काँग्रेसचे अधिकृत ट्वीटर हँडलवर म्हटले की, “देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९६२मध्ये इन्कोस्परद्वारे ‘स्पेस रिसर्च फंडिंग’ आणि आताचे ‘इस्रो’ निर्माण केला. चांद्रयान २ मोहिमेसाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००८ मध्ये मंजुरी दिली. यासाठी काँग्रेसने यांचे आभार मानले आहे.” यानंतरचांद्रयान – २चे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसने ट्वीटवर असे ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.
‘चांद्रयान-२’ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवार्यंत पोहोचण्यास ४८ दिवसांचा कालावधी लागणार आहे. जवळपास १६.२३ मिनिटानंतर ‘चांद्रयान-२’ पृथ्वीपासून १८२ किमी अंतरावर ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ रॉकेटपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या कक्षेत फिरणार आहे. चांद्रयान ६ सप्टेंबरला चंद्रावर दाखल होणार आहे. चांद्रयान-२ ही मोहीम राबवण्यात यश मिळाल्यास अमेरिका, रशिया, आणि चीननंतर प्रगत तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा चौथा देश म्हणून नाव जगभरात ओळखले जाणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.