HW News Marathi
देश / विदेश

आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, आम्ही मजबूत आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत! – व्होदिमर झेलेन्स्की

नवी दिल्ली | “आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, आम्ही मजबूत आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत,” असा आत्मविश्वास युक्रेनच्या अध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी युरोपियन संसदेत म्हटले आहे. गेल्या सहा दिवसांपासून रशिया-युक्रेनचे युद्ध सुरू आहेत. या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागेल असून. रशियाने युक्रेवर युद्ध पुकारल्यापासून जगभरातील देशांनी रशियाच्या अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनमधून सैनिक मागे घेण्याचे आवाहन केले. परंतु, रशियाने अद्यापही त्यांचे सैन्य युक्रेनमधून मागे घेतले नाही. नुकतेच युक्रेनला युरोपियन देशात सामील करून घेतले होते.  यापार्श्वभूमीवर आज (१ मार्च) युरोपियन संसदेच्या विशेष बैठकीत बोलवली होती. 

रशियाने युक्रेनच्या सैन्याला शरण येण्यास सांगितले. परंतु, युक्रेनच्या सैन्यांनी माघार घेतली असून युक्रेनमध्ये सैनिकांसह सर्वसामान्य नागरिक देखील युद्धात सहभागी झाले आहे. तसेच युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींनी देखील देश सोडून न जाता देशात राहून रशियाच्या हल्ल्याचा सामना करत आहेत. यामुळे झेलेन्स्कींचे जगभरात कौतुक होत आहे. युरोपियन संसदेच्या विशेष बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वार झेलेन्स्की सहभागी झाले होते. झेलेन्स्की बोलताना म्हणाले, “युक्रेनची अनेक शहरे रशियाने घेरली असली तरी आम्हाला कोणीही तोडू शकत नाही, आम्ही मजबूत आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत,” असे ते म्हणाले. झेलेन्स्कीच्या भाषणानंतर   युरोपियन संसदेतील सर्व सदस्यांनी त्यांना उभे राहून अभिवादन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत पुन्हा पेट्रोल १८ तर डिझेल ३१ पैशांनी महाग

Gauri Tilekar

आधी अमित शहा आता कर्नाटकच्या भाजप मुख्यमंत्र्यांची शरद पवारांनी घेतली भेट !

News Desk

एअर स्ट्राईकनंतर पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ

News Desk