HW Marathi
देश / विदेश राजकारण

#DelhiViolence : न्यायाधीशांची तडकाफडकी बदली, काँग्रेसची भाजप सरकारवर टीका

मुंबई | दिल्ली हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मुरलीधर यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय बदली करण्यात आली आहे.  दिल्ली हिंसाचार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून काल (२६ फेब्रुवारी) मुरलीधर यांनी सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले होते. या पार्श्वभूमीवर मुरलीधर यांची बदली केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मुरलीधर यांच्या बदलीवरून उत्तर प्रदेशाच्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत भाजप सरकारव निशाणा साधला आहे.

प्रियांका गांधी वाड्रा यांच्या ट्वीट करत म्हटले की, “न्यायाधीश मुरलीधर यांची मध्यरात्री झालेल्या बदलीही सध्याच्या सरकार पाहता धक्कादायक नाही, परंतु हा प्रकार खरोखर खेदजनक आणि लज्जास्पद आहे. देशातील लक्षावधी जनतेचा न्यायपालिकेवर विश्वास आहे. मात्र, न्यायाचा उपहास करणे आणि त्यांचा विश्वास मोडण्याचे सरकार प्रयत्न निंदनीयट आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना, न्यायमूर्ती लोयांची आठवण काढली. “बहादूर न्यायमूर्ती लोया यांची आठवण येते, ज्यांची बदली केली नव्हती”, असे राहुल गांधी म्हणाले.

न्यायाधीश मुरलीधर यांची बदली पुर्वनियोजित

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजीयमने १२ फेब्रुवारीला झाली असून या बैठकीत मुरलीधर यांच्या  बदलीची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालय न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालय बदली केली आहे. राष्ट्रपतींनी न्यायाधीश मुरलीधरन यांना पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालय न्यायाधीश म्हणून काम पाहावे असे, आदेश दिल्याचे त्या बाबतच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

 

Related posts

परळीत फक्त बहिणीचीच हवा, भावांनी लक्षात ठेवा !

News Desk

घर का भेदी लंका ढाये

Gauri Tilekar

कोरोनामुळे राज्यातला लॉकडाऊन वाढणार ?

News Desk